आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात ‘इस्कॉन’ (घ्हीहूग्दहत् एदम्गूब् दि ख्rग्sप्ह ण्दहेम्ग्दल्sहे) या संस्थेची स्थापना 13 जुलै 1966 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात झाली. आजच या संस्थेला 54 वर्षे होत आहेत. ही संस्था भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या संदेशाचा जगातील सर्व देशांमध्ये, सर्व भाषांमध्ये प्रचार करण्यात अग्रस्थानी आहे.
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की, आपण नाशवंत शरीर नसून सनातन आत्मा आहोत. मानव शरीरामध्ये हा फरक आपण जाणू शकतो. आपल्या शरीराला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही दु:खे आहेत आणि त्यातून कायमचे मुक्त होण्यासाठी केवळ मनुष्य जन्मामध्येच प्रयत्न करून आपण यश प्राप्त करू शकतो.
आपण भगवान कृष्णांचे अंश आहोत, त्यांची प्रेममयी सेवा करणे हा आपला मूळ स्वभाव आहे. परंतु याचा आपल्याला देहाभिमानामुळे विसर पडला आहे. आणि हेच आपल्याला भोगाव्या लागणाऱया जन्म, मृत्यू, जरा व्याधी या दु:खाचे मूळ कारण आहे. या दु:खातून आपल्याला मुक्त करण्यासाठीच भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला भगवद्गीता सांगितली आहे, कारण श्रीकृष्णांशिवाय आपल्याला या दु:खातून कोणीही मुक्त करू शकत नाही, म्हणून या दिव्य ज्ञानाचा प्रचार ‘इस्कॉन’ या संस्थेमार्फत जगातील असंख्य देशांमध्ये केला जातो.
भगवान श्रीकृष्ण भगवद् गीतेमध्ये सांगतात. (भ. गी. 12.7)
तेषामहं, समुद्धर्ता, मृत्यूसंसार सागरात ।
भवामि न चिरात्पार्थ मध्यावेशितचेतसाम।।
माझ्या ठायी मन स्थिर करून जे भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था, मी जन्ममृत्यूरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो. आणखी एका श्लोकामध्ये मनुष्यजन्माचा अंतिम उद्देश प्राप्त (परम सिद्धी) केल्यावर काय उन्नती होते हे सांगतात,
(भ. गी. 8.15)
मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम्।
नाप्नुवन्ति मद्दात्मान: संसिद्धीं परमां गता:।।
(भगवान श्रीकृष्ण सांगतात) माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दु:खपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत.
भगवद प्राप्तीकरिता केवळ भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या शेवटी 18 व्या अध्यायात सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुहय़ सर्व जिवाच्या हितासाठी सांगताना म्हणतात. (भ. गी. 18.65)
मन्मना भव भद्भक्तो मध्याजी मां नमस्कुरु ।
मा मैवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियो।़सी मे।।
सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. वरील संदेश केवळ भगवद्गीतेचे सार नाही तर संपूर्ण वेदांचे सार आहे. एवढे जरी ज्ञान आपल्याला असेल तरी या दुर्मिळ मनुष्य देहाला भगवान श्रीकृष्णाच्या
प्रेममयी सेवेत अर्पण करून जन्माचे सार्थक आपण करू शकतो. म्हणूनच तुकाराम महाराज सुद्धा हीच शिकवण आपल्याला खालील अभंगाच्या ओळीतून देत आहेत. गीता भागवत करीती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे ।। दररोज गीता भागवत या ग्रंथाचे वाचन करावे, आणि भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे अखंड चिंतन करावे. याच संदेशाचा प्रचार ‘इस्कॉन’तर्फे केला जातो. भगवान श्रीकृष्ण भगवद् गीतेमध्ये आपल्याला भगवत भक्ती करण्याची जी शिकवण देतात ती भक्ती कशी करावी हे शिकविण्यासाठी तेच श्रीकृष्ण इ.स.1486 साली श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. स्वत:च्या उदाहरणावरून श्रीकृष्ण भक्ती कशी करावी, हे त्यांनी समाजाला शिकविले आणि एक भविष्यवाणीही सांगितली.
पृथ्वीते आछे यत नगरादी ग्राम।
सर्वत्र प्रचार होइवो मोर नाम।।
पृथ्वीवरील सर्व शहरे आणि गावांमध्ये माझ्या नामाचा प्रचार होईल. त्याचबरोबर त्यांनी स्वत: हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम, राम राम हरे हरे।। या महामंत्राचा प्रचार केला. पुढे 19 व्या शतकात भारतातील महान संत कृष्णकृपामूर्ति ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी सर्व जगामध्ये या हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला. स्वामी प्रभुपाद यांनी वयाच्या 70 व्या वषी आपले गुरु श्रील भक्तीसिद्धांत सरस्वती यांच्या ‘सर्व जगामध्ये श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार कर’ या आज्ञेचे पालन करण्यासाठी मालवाहू जहाजामधून अतिशय खडतर प्रवास करून केवळ 40 रु. आणि भागवत ग्रंथ घेऊन सप्टेंबर 1965 मधे अमेरिकेत पदार्पण केले. अतिशय कठोर परिश्रमानंतर 13 जुलै 1966 रोजी ‘इस्कॉन’ची श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी स्थापना केली. त्यानंतर केवळ 12 वर्षात स्वामी प्रभुपाद यांनी 14 वेळा संपूर्ण जगभर प्रचार करत 108 श्रीकृष्ण मंदिरांची स्थापना केली. त्याचबरोबर भगवद् गीता, भागवत, चैतन्य चरितामृत यासह 80 हून अधिक वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे ग्रंथ लिहिले. या ग्रंथांच्या आधारे ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ जीवन पद्धती जीवनात पालन करण्यासाठी करोडो लोकांना प्रेरित केले. आज जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये इस्कॉनची 650 हून अधिक श्रीकृष्ण मंदिरे आहेत. त्याचबरोबर लाखो प्रचार केंदेही आहेत. 200 हून अधिक कृषी गोरक्षा केंदे आहेत.
इस्कॉनचे सर्वात मोठे योगदान म्हणजे श्रील प्रभूपाद यांचे ग्रंथ. आज भगवद् गीता, भागवत, 80 पेक्षा जास्त भाषांमध्ये सर्व देशामध्ये उपलब्ध आहेत. या संस्थेमध्ये सर्व जातीधर्माचे, देशाचे, समाजातील सर्व घटकांचे लोक आनंदाने श्रीकृष्ण भक्तीचे पालन करत प्रचार करीत आहेत. आतापर्यंत सर्व जगामध्ये सर्व भाषेमध्ये 51 कोटी वैदिक ग्रंथांचे वितरण झाले आहे. सर्वांना श्रीकृष्ण भक्तीमय जीवन जगण्यासाठी इस्कॉनची मंदिरे व भगवद् गीता, भागवतसारखे ग्रंथ प्रेरणा देत आहेत.
चैतन्य महाप्रभुंनी 500 वर्षापूर्वी हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम रामराम हरे हरे या महामंत्राचा प्रचार जगातील सर्व शहर आणि गावामध्ये होईल ही केलेली भविष्यवाणी श्रीलप्रभूपादांनी प्रत्यक्षात आणली. इस्कॉनची मंदिरे ही केवळ मंदिरे नसून भगवद्गीता प्रत्यक्षात आपल्या जीवनात पालन कशी करावी, हे शिकविणारी वैदिक ज्ञानाची विद्यालये
आहेत. भारतातील सर्व प्रमुख शहरात इस्कॉनची मंदिरे अथवा प्रचार केंद्रे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात शंभरहून अधिक मंदिरे आणि प्रचार केंद्रे आहेत या मंदिरांमार्फत भगवद् गीता, भागवत व हरेकृष्ण महामंत्राचा प्रचार केला जातो व प्रत्यक्षात गीता कशी आचरणात आणावी हे शिकविले जाते. मंदिर असलेल्या परिसरातील लाखो लोक या मंदिरांमधून प्रेरणा घेतात.
वृंदावनदास