वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य सुविधांवरील ताण वाढू लागला आहे. याचदरम्यान भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) नवी मार्गदर्शक तत्वे जारी करत नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. याच्या अंतर्गत अनेक शेणींमध्ये लोकांना चाचण्यांपासून सूट देण्यात आली आहे.
कोरोना संबंधी उद्देशपूर्ण चाचणी रणनीतिसाठी आयसीएमआरने हे नियम जारी केले असून यामुळे कोरोना-ओमिक्रॉनच्या बाधितांना योग्यप्रकारे आणि जलद उपचार मिळू शकतील. देशात कोरोनाबाधितांची प्रतिदिन संख्या दोन लाखांच्या नजीक पोहोचली असताना हे दिशानिर्देश देण्यात आले आहेत.
आयसीएमआरचे दिशानिर्देश
1 कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेला व्यक्ती वय किंवा सहव्याधींनी पीडित असल्याने ‘अधिक जोखीम’युक्त ठरविला गेला नसल्यास चाचणीची गरज नाही.
2 एका राज्यातून दुसऱया राज्यात प्रवास करणाऱया व्यक्तींना देखील कोरोना चाचणी करविण्याची आवश्यकता नाही.
3 चाचणी आरटी-पीसीआर, ट्रूनेट, सीबीएनएटी, सीआरआयएसपीआर, आरटी-एलएएमपी, रॅपिड मॉलिक्यूलर टेस्टिंग सिस्टीम्स किंवा आरएटीद्वारे करता येऊ शकते.
4 पॉईंट ऑफ केयर टेस्ट (घरोघरी, स्वचाचणी किंवा आरएटी) आणि मॉल्युकर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास पुन्हा चाचणी न करता बाधित मानले जाऊ नये.
5 लक्षणेयुक्त, घरी किंवा सेल्फ टेस्ट अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांनी आरएटी किंवा आरटी-पीसीआर चाचणी करवून घ्यावी.
6 लक्षणे नसल्यास रुग्णाला सर्जिकल किंवा नॉन सर्जिकल प्रक्रियांप्रकरणी दिलासा. यात संसर्गाची लक्षणे नसलेल्या गरोदर महिलांचा समावेश.
7 चाचणीच्या अभावी कुठल्याही आपत्कालीन प्रक्रिया, शस्त्रक्रिया आणि प्रसूतीमध्ये विलंब केला जाऊ नये.
8 रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची आठवडय़ात एकापेक्षा अधिक वेळा चाचणी केली जाऊ नये.
9 लक्षणेरहित, विलगीकरणातून बाहेर पडलेले तसेच होम आयसोलेशन अंतर्गत डिस्चार्ज मिळालेल्या लोकांना चाचणी करविण्याची गरज नाही.









