माध्यमांनी सत्यता पडताळून माहिती प्रसारित करावी
बेंगळूर/प्रतिनिधी
विवाह आणि इतर कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच जारी करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी सरकारने संख्यांची मर्यादा घालून दिली आहे. परंतु आंतरराज्य प्रवासात कोणतेही निर्बंध नाहीत”, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. ते बुधवारी बेंगळूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कोरोना पसरण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी हॉटेल आणि मॅरेज हॉलमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात खबरदारीचा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली आहेत. आम्ही रात्री उशिरा होणाऱ्या पार्टींवर बंदी घातली आहे कारण त्यावेळेस जास्त लोक जमा होतात. कारण त्यामुळे कोरोना संख्येत वाढ झाली आहे. शेजारील राज्यात प्रकरणे वाढत असल्याने आपल्या राज्यात कोरोना पसरण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सर्व पावले उचलली आहेत, असे मंत्री म्हणाले. राज्यभरातील ३५०० केंद्रांवर लसीकरण दिले जात आहे, तसेच आम्ही चाचण्यांची संख्याही वाढविली आहे, असेही ते म्हणाले.
“मीडिया गॅग ऑर्डरवर बोलताना मंत्री म्हणाले की मीडिया हा लोकशाही व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ आहे. सत्यता पडताळण्यापूर्वी मीडियाने कोणतीही आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करू नये. अशा आशयाची सत्यता पडताळणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. व्हिडिओच्या मागे राजकीय कारस्थानांसह अनेक कारणे आहेत”, असे ते म्हणाले.









