शिक्षण विभागाने केले छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नियोजन
प्रतिनिधी/ सातारा
गेली सात महिने परजिह्यातून स्वतःच्या जिह्यात आलेल्या 121 शिक्षकांना शिकवण्यासाठी शाळा मिळत नव्हती. स्थानिक संघटनांकडून नेहमीच समुदेशन करताना विस्थापित आणि रॅण्डम राऊंडचीच मागणी केली जात होती. वास्तविक ज्यांना गरज आहे त्यांना शाळा देण्याचे काम मागे पडत होते. आता मात्र, दि.8 रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समुपदेशाने शाळा दिल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीहून आलेल्या शिक्षकांना आता शाळा मिळणार आहे.
स्वतःच्या जिह्यात येवूनही शिक्षकांना शाळा मिळत नाही. नोकरीवर हजर व्हायला शाळा मिळण्यासाठी अनेक अडचणी आंतरजिल्हा बदलीहून आलेल्या शिक्षकांना त्रास झाला. स्थानिक शिक्षक संघटनांकडून वारंवार पदाधिकाऱयांना भेट घेवून त्यांच्यासमोर विस्थापित आणि रॅण्डम राऊंड वाल्यांच्यावर किती अन्याय झाला आहे असे दाखवून दिले जाते. दि.4 सप्टेंबर 2019 च्या आदेशानुसार ही पदस्थापना समुपदेशाने देण्यात येणार आहे. त्यामध्ये मागील वर्षातील 5 व्या व 6 व्या टप्यातील शिक्षक, समुदेशनाने आलेले शिक्षक, आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये काही जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण शिक्षक कार्यरत होते. तथापि, आंतरराष्ट्रीय शाळेसाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेले शिक्षक प्राप्त झाल्यामुळे कार्यरत असलेले सर्वसाधारण जिल्हा परिषद शिक्षक, त्या शाळेतून बाहेर निघाल्यानंतर असे शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने हजर होणारे शिक्षक, पवित्र प्रणालीद्वारे नव्याने येणारे शिक्षक यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिह्यात रिक्त असलेल्या शाळा कराड तालुक्यातील कचरेवाडी, हजारमाची, सुली, वाघेरी, नांदलापूर, वडगाव हवेली, उंब्रज मुली, विजयनगर, भवानगाडी, खराडे, कसूरुड, कोळवडी, कोपर्डे हवेली, पाल, पेंबर, जिजामातानगर, उत तांबवे, हनुमानवाडी, अकाईचीवाडी, मनव, कासरशिरंबे, येरवळे नबर 1, येरवळे नंबर 2, घारेवाडी नंबर 2, खुबी, विंग, येवती, कणसेमळा वाघेरी, बेलवाडी, वाजेवाडी, वाण्याचीवाडी, खटाव तालुक्यात पुसेसावळी नंबर 1, बोंबाळे, कळंबी, सिद्धेश्वरकुरोली, चोराडे, महाबळेश्वर तालुक्यात तायघाट, लामज, सालोशी, पारुट नंबर 1, अवकाळी, भेकवली म. कुंभरोशी, देवळी, हातलोट, कळमगाव, फलटण तालुक्यात हनुमाननगर, कांबळेश्वर, मिरगाव, मोहितेवस्ती, जिंती, तरडगाव, तांबवे, हिंगणगाव, सरडे, आसू, करवी गाव, भाडळी खुर्द, पाटण तालुक्यातील वनकुसवडे, पळासरी, काठी, अवसरी, काठीटेक, हुंबरळी, कोयनानगर, कोयनानगर, हेळवाक, वांझोळे, काळोली, पाथरपुंज, गोठणे, डफळवाडी, घोट, जवरातवाडी, चापोली, खिवशी, घाणबी, निवकणे, बेंद्री, वनवासवाडी, जाईचीवाडी, मेष्टेवाडी, बिबी, गुजरवाडी, डिगेवाडी, काळेवाडी, ठोमसे, दिवशी बुद्रुक, कोकिसरे, किल्ले मोरगिरी, धावडे, हुंबरणे, आंब्रग, सातेवाडी, कुसरुंड, डावरी, तामिणे, सळवे, पाटण मुली, इंदिरानगर, रामापूर, बांबूचीवाडी, मठाचीवाडी, निवी, पवारवाडी, कदमवाडी, वाजेगाव नाणेल, जमदाडवाडी, मंद्रूळकोळे, सातारा तालुक्यातील खोजेवाडी, बनघर, जळकेवाडी, वासोळे, आगुंडेवाडी, जावली तालुक्यातील उंबरीवाडी , दुंद, बामणोली कसबे, माण तालुक्यात काळापट्टा, पानवण, मसाईवाडी, बनगरवाडी, खुटबाव, पिंपरी या शाळेंवर आता समुपदेशानाने शिक्षक दिले जाणार आहे.








