प्रतिनिधी/ पणजी
52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पदार्पण स्पर्धेसाठी निवडलेल्या चित्रपटांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून हा महोत्सव अनेक नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचा मंच ठरला आहे आणि पदार्पण विभागात चालू वर्षातील सर्वोत्कृष्ट नवोदित चित्रपट निर्मात्यांना पुढे आणणे हे उद्दिष्ट आहे.
या विभागात निवड झालेल्या चित्रपटांमध्ये (1) सागर पुराणिक दिग्दर्शित ’डोल्लू’ (कन्नड), (2) विवेक राजेंद्र दुबे दिग्दर्शित ’फ्युनरल’ (मराठी), (3) रुबेन सेन्झ दिग्दर्शित ’मागोडो’ (स्पॅनिश, ब्राझिलियन-पोर्तुगीज), (4) आरश अनिसी दिग्दर्शित ’मामन’ (फारसी), (5) दिमित्रीस कानेलोपौलोस दिग्दर्शित ’पॅक ऑफ शिप’ (ग्रीक), (6) जानो जर्गेन्स दिग्दर्शित ’रेन’ (एस्टोनियन, रशियन), (7) लॉरा लेहमस दिग्दर्शित ’स्वीट डिझास्टर’ (जर्मन), (8) सायमन फॅरिओल दिग्दर्शित ’द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’ (स्पॅनिश), (9) मारी अलेसेंद्रिनी दिग्दर्शित ’झाहोरी’ (स्पॅनिश, इटालियन, इंग्रजी, मपुडुनगुन) आदी चित्रपटांचा समावेश आहे.









