हैदराबाद / वृत्तसंस्था
जागतिक स्तरावरील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणाऱया, तब्बल 9 हजार किलोग्रॅम वजनाच्या व 56.1 फूट उंचीच्या अजस्त्र बॅटचे रविवारी हैदराबादमध्ये उद्घाटन करण्यात आले. माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या हस्ते या महाकाय बॅटचे उद्घाटन केले गेले असून सध्या ती चाहत्यांसाठी प्रदर्शनात ठेवली गेली आहे.
पेरनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बेवरेज कंपनीने सदर बॅटची निर्मिती केली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जागतिक स्तरावरील सर्वात लांब बॅट म्हणून याची नोंद झाली आहे. टँक बंड येथे दि. 15 नोव्हेंबरपर्यंत ही बॅट प्रदर्शनासाठी ठेवली जाणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.









