इस्लामपूर प्रतिनिधी
सांगली येथे शनिवार, २ एप्रिल रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास वाळवा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अँड.चिमण डांगे यांनी दिली.
इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वाळवा तालुक्यातील प्रमुख धनगर समाज बांधव यांच्या बैठकीत ते बोलत होते. सांगली येथील रघुवंशी सोसायटी शाहूनगर, विजयनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च तंत्र शिक्षण मंत्री. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार असून राज्यातील अनेक मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी व विविध पक्षातील कार्यकर्ते व धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक . बाळासाहेब पाटील नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक हरिदास पाटील, सांगली जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, धनगर समाज महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष उद्योजक बाबुराव हूबाले यांनी मनोगते व्यक्त केली.