सांगली/प्रतिनिधी
सांगलीमध्ये उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे 27 मार्चला लोकार्पण करण्याची भारतीय जनता पार्टी कडून जय्यत तयारी करण्यात आली असून शनिवारी सांगली येथे अहिल्यादेवी स्मारकाची आमदार गोपीचंद पडळक , माजी आमदार नितीन शिंदे, माजी महापौर संगीता खोत, दिपक शिंदे, शेखर इनामदार तसेच नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व समाज बांधवांनी पाहणी केली.
दरम्यान, यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी येत्या 27 मार्चला मेंढपाळांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगितले. 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्या अगोदरच भाजपाच्या वतीने 27 मार्चलाच लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पणाला भाजपने विरोध केला असून मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी भाजपाने तयारी केली आहे.









