प्रतिनिधी / कराड
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनाने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर फार मोठा आघात झाला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. गृहमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उजवा हात समजले जाणारे अहमद पटेल यांनी सुमारे 20 वर्षे काँग्रेस संघटनेत महत्वाची भूमिका बजावली होती. कोणत्याही राज्यात पक्षांतर्गत किंवा सरकारमध्ये काही वाद निर्माण झाले तर ते तातडीने त्यात लक्ष घालून प्रश्न सोडवत असत. त्यांच्या जाण्याने पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, असे ते म्हणाले.









