गुजरातमध्ये 500 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त आहेत. परंतु याचदरम्यान अहमदाबाद शहरातून चांगली बातमी हाती लागली आहे. तेथे नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.
कमी होतेय संख्या
09 एप्रिल रोजी शहरात 59 नवे रुग्ण सापडले होते. तर 10 रोजी हा आकडा कमी होत 48 वर पोहोचला आहे. 11 एप्रिल रोजी 46 नवे रुग्ण सापडले तर 12 एप्रिलला हा आकडा 39 वर आला आहे. तर 13 एप्रिल रोजी केवळ 13 नवे रुग्ण आढळले आहेत.
कष्टाला येतेय फळ
सातत्याने चाचणी केली जात आहे. तसेच टाळेबंदीचे कठोर पालन करण्यात येत असल्याने नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे उद्गार अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी काढले आहेत.
सातत्याने चाचणी
आयुक्तांकडून आरोग्य कर्मचाऱयांचा उत्साह सातत्याने वाढविला जातोय. बफर झोनमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत होती. ‘चेसिंग द व्हायरस’ मोहीम तसेच रुग्णांना शोधण्याचे कार्य सुरू आहे. बफर झोनमध्ये घरोघरी जात वैद्यकीय तपासणी तसेच चाचणी केली जात असून त्याचे चांगले निष्कर्ष प्राप्त होत आहेत. कोरोनाबाधित संसर्गापासून मुक्त होत घरी परतत आहेत.
गुजरातमधील स्थिती
गुजरातमध्ये रविवारी 23 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 516 झाली आहे. तर राज्यात कोरोनामुळे 24 जणांना जीव गमवावा लागला आहे.









