तेल अवीव विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचे संशोधन : कॉर्टिकोस्टेरॉयड औषध कारणीभूत :
अस्थमाने ग्रस्त लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण फैलावण्याचा धोका 30 टक्क्यांपर्यंत कमी आहे. 37 हजार लोकांच्या एका समुहावर करण्यात आलेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. सामान्य लोकांच्या कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या तुलनेत अस्थमा असणाऱया लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे संशोधन करणाऱया इस्रायलच्या तज्ञांचे म्हणणे आहे.
वैज्ञानिकांनुसार याचे कारण अस्थमाचे औषध ‘कॉर्टिकोस्टेरॉयइड’ आहे. या औषधामुळे सूज कमी होते. हे औषध इन्हेलरद्वारे रुग्णांना दिले जाते. याचमुळे महामारीच्या दरम्यान अस्थमाच्या रुग्णांनी औषधे बंद करू नयेत. जर्नल ऑफ ऍलर्जी अँड क्लीनिकल इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार अस्थमाच्या रुग्णांवरील उपचार दिशानिर्देशानुसार केले जावेत.
संक्रमण कमी होण्याची 3 कारणे
संशोधन करणाऱया इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी अस्थमाच्या रुग्णांमध्ये कोविड-19 चे संक्रमण कमी होण्याची तीन कारणे नमूद केली आहेत.
पहिले : श्वसनाच्या आजारांना तोंड देणारे रुग्ण अत्यंत दक्ष आहेत आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. ते मास्क परिधान करत असून सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत तसेच साफसफाईवर लक्ष देत आहेत.
दुसरे : कोरोना ज्या एसीई2 रिसेप्टरद्वारे शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करतो, त्याचे अस्थमाच्या रुग्णांमध्ये प्रमाण कमी असते. याचमुळे त्यांना असणारा संक्रमणाचा धोका कमी झाला आहे.
तिसरे : अस्थमाच्या रुग्णांना इनहेलरमध्ये कॉर्टिकोस्टेरॉयड दिले जाते, हे कोरोना विषाणूला एसीई2 रिसेप्टरद्वारे शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते.
संशोधनाचे स्वरुप
संशोधनासाठी वैज्ञानिकांनी इस्रायलच्या 7 लाख 25 हजार आरोग्य कर्मचाऱयांच्या डाटाचा वापर केला आहे. यात विशेषकरून 37,469 लोकांना वेगळे करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून 2020 दरम्यान त्यांची कोविड-19 चाचणी झाली होती. यातही पूर्वीपासून एखाद्या आजारा तोंड देणारे 2,266 जण कोरोना पॉझिटिव्ह दिसून आले होते. अस्थमाच्या पॉझिटिव्ह ग्रूपमध्ये 6.75 टक्के लोक संक्रमित निघाले, तर दुसऱया निगेटिव्ह ग्रूपमध्ये 9.62 टक्के लोकांना संक्रमण झाले नसल्याचे आढळून आले आहे. विविध घटक म्हणजेच लिंग, वय, ध्रूमपान आणि अन्य आजारांच्या धोक्याच्या आधारावर याचे विश्लेषण करण्यात आले, अस्थमाच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांपर्यंत कमी धोका दिसून आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.









