नवी दिल्ली
जगभरात स्पोर्टस् कारच्या निर्मितीत नावाजलेली कंपनी अस्टॉन मार्टीनने भारतात आपलीपहिली एसयूव्ही डीबीएस कार लाँच केली आहे. उत्तम डिझाईनसह कारचा आकारही आरामदायी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अस्टॉन मार्टीन ही स्पोर्टस् कार्सच्या बाबतीत आघाडीवरची लोकप्रिय कंपनी असून हॉलीवूडमधील जेम्स बाँडची ही आवडती कार आहे. 4 लिटर ट्वीन टर्बोचार्जड व्ही 8 इंजिन यात असून नाइन स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटीक गियरबॉक्स व ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमही यात आहे. 4.5 सेकंदात ही गाडी 100 किलोमीटरचा वेग घेण्यास समर्थ आहे. जास्तीत जास्त 291 कि.मी. चा वेग ताशी ही गाडी घेऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.









