वार्ताहर /कुडचडे
असोल्डा, केपे येथील श्री सांतेरी ग्रामदेवी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार 6 व सोमवार 7 असा दोन दिवस विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त 6 रोजी सकाळी 9 वा. श्री सांतेरी ग्रामदेवीस महाभिषेक, पूजा, नैवैद्य, आरती, रात्री 8 वा. पुराण, आरती, तीर्थप्रसाद होईल. सोमवार 7 रोजी सकाळी 9 वा. श्री सांतेरी ग्रामदेवीस महाभिषेक, पूजा, नैवेद्य, आरती, रात्री 8 वा. आरती, तीर्थप्रसाद असे कार्यक्रम होतील. तरी सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून श्रीकृपेचा लाभ घ्यावा तसेच कोविड-19 प्रतिबंधक नियमांचे लक्षपूर्वक पालन करून कोविडचा प्रसार रोखण्यास सहकार्य करावे, असे देवस्थान समितीने कळविले आहे.









