खानापूर :
असोगा बंधाऱयाचा उत्तर दिशेचा म्हणजेच भोसगाळी गावाकडील भराव पूर्णपणे वाहून जाऊन मोठा खड्डा पडला आहे. वास्तविक पाण्याचा झोत पाहता दगडी अथवा काँक्रीटचे बांधकाम करणे गरजेचे आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी का दुर्लक्ष करतात हे समजत नाही. दरवषी लाखो रुपये खर्च करून किरकोळ डागडुजी केली जाते व सरकारी तिजोरीचे निरंतर नुकसान होत असते. या सर्व प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे.









