प्राधिकरणाकडून अव्वाच्या सव्वा बिले, कचऱयाचे सामाज्य, कामांमध्ये होतोय दुजाभाव, अनेकदा तक्रारी मागणी करुनही दुर्लक्ष, गोडोलीकरांनी दिले मुख्याधिकाऱयांना निवेदन
विशाल कदम / सातारा
गोडोली हा शहरात मोडणारा भाग येतो. काही भाग हा त्रिशंकूमध्ये येतो. गोडोलीला प्रामुख्याने पाणी पुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जातो. पाण्याच्या समस्या आहेत. परंतु विकास कामाच्या बाबतीतही दुजाभाव केला जातो. निधी वळवण्याचा घाटही घातला जात आहे. कचऱयाची समस्या आहे. त्यामुळे गोडोलीतील त्रिशंकू भाग जरी सातारा शहराच्या हद्दवाढीत आला असला तरीही गोडोलीकर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, आज गोडोलीतील नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन दिले आहे.
गोडोली हा भाग पालिकेच्या हद्दीत येतो. परंतु गोडोलीच्या नजिकच्या साइं& बाबा मंदिर झोपडपट्टी, ठक्कर सिटी, शिवनेरी कॉलनी यासह काही भागाकडे जाणीवपुर्वक पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या हद्दवाढ झाली असली तरीही या भागाकडे विशेष करुन दुर्लक्ष होत आहे. या भागाला पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केला जातो. प्राधिकरणाच्या पाईपलाईनला अनेक गळत्या. त्या गळत्याही काढल्या जात नाहीत. पाण्याची टंचाई असे असताना बिले मात्र भरमसाठ पाठवली जातात. गोडोलीकरांच्यावर हा अन्यायच आहे. विकास कामाच्या बाबतीतही दुजाभाव केला जात आहे. अगदी मागणी करुनही निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. हॉटेल राजयोगच्या पाठीमागे असलेल्या विविध सोसायटींमध्ये नागरिकांनी स्वतःच्या वर्गणीतुन निधी गोळा करुन घंटागाडय़ा सुरु केल्या आहेत. परंतु रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, गोडोलीतील समस्या सोडविण्यासाठी आज गोडोलीतील नगरसेवक शेखर मोरे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. वैभव मोरे, सुशांत मोरे, सौरभ भोईटे, ओमकार जाधव, जीवनकुमार काटकर आदींनी निवेदन दिले.
कासचे पाणी गोडोलीला द्या
गोडोलीकरांनी नेमकी काय चुकी केली? पाणी पुरवठा पूर्व भागाला आणि पश्चिम भागाला वेगवेगळा केला जातो. परंतु गोडोलीकरांना जीवन प्राधिकरणाकडून अव्वाच्या सव्वा बिले पाठवली जातात. सगळया रस्त्यावर गळत्या लागलेल्या आहेत. गळत्या काढल्या जात नाहीत. मीटर पद्धतीने बील आकारणी होते. गोडोलीकरांच्यावर हा अन्याय आहे. कासचे पाणी स्वस्त आणि जीवन प्राधिकरणाचचे महाग. ग्रेड सेपरेटरचे कामावेळी जेव्हा पाईप लाईन तुटातुटी झाली तेव्हा पर्यायी व्यवस्था प्राधिकरणाकडे नव्हती.
शेखर मोरे पाटील नगरसेवक तातडीने उपाययोजना करा
शहराची हद्दवाढ झाल्याने त्रिशंकू भागातील गोडोली, साई मंदिर, झोपडपट्टी, मोरे कॉलनी, यशवंत कॉलनी, बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसर, ठक्कर सिटी आदी भागासह त्रिशंकू भाग हा पालिकेच्या अखत्यारित आलेला आहे. हा भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला होता व आहे. पथदिवे बंद असतात. भागातला कचरा नियमित उचलला जात नाही. साई मंदिर ते कल्याणी शाळेजवळ अतिक्रमण झाले आहे. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
ऍड. वैभव मोरे









