वॉर्ड क्रमांक १ ते १० | क्रमशः तमाम बेळगावकरांचे लक्ष लागुन राहिलेल्या महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहिर झाली आणि त्याच क्षणापासून मोर्चेबांधणीही सुरू झाली. गुडघ्याला बाशिंग लावून निवडणुकीची तयारी करणाऱया इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आणि हौशा नवशा गवशांनी सुद्धा अंदाज बांधण्यास प्रारंभ केला.तथापी कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे आपला नेमका वॉर्ड कोणता? वॉर्ड पुनर्रचना झाल्याने अनेकांना आपला वॉर्ड नेमका कोणता याचीच कल्पना नाही. याच पार्श्वभुमीवर प्रत्येक वॉर्डमध्ये येणारा भाग कोणता याची माहिती आम्ही आराखडय़ासह आजपासून प्रसिद्ध करीत आहोत.



















