प्रतिनिधी / मालवण:
तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने असंघटीत कामगारांसाठी योजना आणि कायदेशीर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन रविवार १७ ॲाक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता सर्जेकोट ग्रामपंचायत येथे करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास मच्छीमार, मत्स्य विक्रेते, खलाशी आणि इतर व्यावसायिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले आहे.