प्रतिनिधी / कोल्हापूर
फेसबुक अकाऊंटवरील फोटो घेऊन त्यामध्ये पॉर्न अश्लील व्हिडिओ एडिटिंग करून ते फोटो, अश्लील व्हिडिओ फिर्यादीच्या व्हॉटसऍपला पाठवून एका दिवसात फिर्यादीकडून ऑनलाईन 45 हजार रुपये उकळल्याची घटना शनिवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयितास अद्याप अटक केलेली नाही.
विशाल शहाजी गडकरी (रा. शाहुनगर, राजारामपुरी) यांचे आणि त्यांच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट आहे. शनिवारी त्यांना त्यांच्या मोबाईलवर राहुल यादव नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांना अनैतिक कृत्यासंबंधी विचारणा केली असता विशाल यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्याने तुम्हाला आमच्या हॅकर्स व हॉटेलचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. या गोष्टीलासुद्धा विशाल यांनी नकार दिल्यानंतर संशयित आरोपीने विशाल आणि त्यांच्या पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरील फोटो घेऊन त्यामध्ये पॉर्न अश्लील व्हिडिओ एडिटिंग करून ते फोटो, अश्लील व्हिडिओ विशाल यांच्या व्हॉट्सऍपला पाठवून दिले. त्यानंतर पैसे दिले नाहीतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल करण्याची धमकी दिली. विशाल यांच्या व्हॉट्सऍपवर पेटीएमचा क्युआर कोड पाठवून त्यांच्याकडून दिवसभरात 45 हजार रुपये त्याने उकळले.









