नवी दिल्ली
हिंदुजा ग्रुपअंतर्गत अशोक लेलँडच्या ऑक्टोबरमधील वाहन विक्रीत 11 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्ये 11 हजार 79 व्यावसायिक वाहनांची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात कंपनीला 9 हजार 989 वाहनांची विक्री करता आली होती. एकंदर स्थानिक स्तरावर मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 35 टक्के इतकी वाढ राहिली आहे. पण दुसरीकडे हलक्या व्यावसायिक वाहनांना प्रतिसाद कमी लाभला आहे.









