वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदुजा समूहाची कंपनी अशोक लेलँडकडून शुक्रवारी आपल्या 4 एक्सल आणि 14 चाकांच्या एव्हीटीआर 4120 या ट्रकचे सादरीकरण केले आहे. ज्याची एकूण क्षमता ही 40.5 टन असल्याची माहिती आहे. अशोक लेलँडने दिलेल्या माहितीनुसार अन्य ट्रकांच्या तुलनेत हा ट्रक पाच टन अतिरिक्त वजन पेलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आमचा प्रयत्न नेहमी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हा असणार आहे. त्यामुळे आमचा पैसा मिळवणे हा उद्देश नसून ग्राहकांना सेवा देण्यास तत्पर असल्याचे कंपनीचे संचालक विपिन सोंधी यांनी म्हटले आहे.









