ऑनलाईन टीम / मुंबई :
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना आज घरी सोडण्यात आले.
24 मे रोजी चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते उपचारासाठी नांदेडमधून मुंबईत आले. 25 मे ला ते उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर 8 ते 9 दिवसात त्यांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनीही कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील मंत्री योग्य खबरदारी घेत आहेत. महत्वाच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहेत.









