प्रतिनिधी / अक्कलकोट
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे पिताश्री तथा जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर क्षणातच मनाला धक्का बसला.अत्यंत वाईट वाटले. सन १९७४ च्या काळात भाई छन्नोसिंग चंदेले यांना अक्कलकोट विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. झालेल्या निवडणुकीत चंदेले यांना निवडून आणण्यासाठी जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी आमच्यासोबत जीवापाड कार्य केले. स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांची कै.नामदेवराव जगताप,तत्कालीन आमदार बी.टी.माने,काशिराया काका पाटील,चपळगावचे स्व.इनायतल्ली पाटील,कै. महादेव पाटील यांच्याशी दृढ मैत्री होती.
त्यांच्यामूळेच अक्कलकोट तालूका हा काँग्रेसचा अभेद भिंत राहिला.त्यांच्याशी आमची दृढ मैत्री होती. त्यांच्यासारखे निष्ठावंत माणूस आजपर्यंत मी फार कमी पाहिली आहेत.पक्षाच्या जडणघडणीसाठी अशी माणस दुर्मिळ होत चालल्याची भावना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संपूर्ण कुटूंबियांसह दुधनी येथे जाऊन म्हेत्रे परिवाराची भेट घेतली.यानंतर शिंदे यांनी ही भावना व्यक्त केली.
शुक्रवारी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दुधनी येथे स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे,माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,गटनेते चेतन नरोटे,शंकर म्हेत्रे,सातलिंग शटगार, अश्पाक बळोरगी,सुरेश हसापूरे,जहांगीर शेख,मंगल पाटील,समाधान अवताडे आदी उपस्थित होते.
Previous Articleकिरकोळ वादातुन पानगावात हाणामारी, बार्शी पोलीसात गुन्हा दाखल
Next Article सांगली जिल्ह्यात नवे 314, तर कोरोनामुक्त 529









