शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ पोलीस ठाणे व अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या सुगंधी तंबाखू व खत्री सुपारी कारखान्यावर धाड टाकून एकास अटक केली. उदय नारायण मूल्या (रा. संभाजी नगर, जयसिंगपूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या कारवाईत 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरोळ जयसिंगपूर रोड वरील रत्नाप्पाण्णा कुंभार मालखेडामध्ये बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा व कत्री सुपारी पॅकिंग करून विक्री करीत असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कोल्हापूरच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज, शनिवारी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी संशयित उदय मूल्या यास ताब्यात घेत 85 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.