वैराग / प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अवैध धंदे अवैद्य धंदे वाल्या वर कायद्याचा हातोडा असणार असून कायदा व सुव्यवस्था न राखणाराची गय केली जाणार नसल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वैराग पोलीस स्टेशन येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले .
सोलापूर जिल्ह्याच्या अधिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर सातपुते यांनी प्रथमच वैराग पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी वैराग पोलीस स्टेशन च्या बाबतीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच वैराग पोलीस पोलिस स्टेशनची इमारत जीर्ण झाली असल्यावर प्रश्न उपस्थित केला असता सध्याच्या काळात समोरच्या इमारतीत तात्पुरती सोय करून जुन्या इमारतीची डागडुजी करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. वैराग पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या बाबतीत बोलताना सातपुते म्हणाले की ,चालू वर्षाच्या बदल्या झाल्या असून आगामी काळात नक्कीच वैराग स्टेशनला पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल .
वैराग भागातील अवैद्य वाळू उपसा ,मटका, हातभट्टी दारू या बाबत बोलताना सातपुते म्हणाले की, अवैद्य धंदे व अवैद्य धंदे वाले यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसून आगामी काळात अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या शिवाय पोलीस राहणार नाहीत. मी सोलापूर कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष ग्रामीण भागात फिरून तसेच पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील समस्या व अडचणी जाणून घेऊन मार्ग काढणार आहे .तसेच जनतेला सुरक्षेची हमी देणार आहे .या अगोदर चे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जी कार्यपद्धती अवलंबलेली आहेत त्यानुसारच आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात कार्य करणार व जनतेच्या सुरक्षेची काळजी व गुन्हेगारीवर वचक ठेवणार असल्याची ग्वाही सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









