प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यात अवैध धंदे असता कामा नये़, पोलिसांचा अवैध धंदेवाल्यांशी सहभाग असता कामा नये, तसे आढळून आल्यास मी बडतर्फीची कारवाई करीन, असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज करमाळा येथे पोलीस ठाण्यास भेट देउन पोलिसांशी संवाद साधताना दिला.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज दुपारी करमाळा पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी करून पोलिसांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरिकांची तुम्ही दखल घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली पाहिजे. खोट्या फिर्यादी दाखल होता कामा नयेत. समाजात वावरताना तुमची वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे,अन्यथा तुमच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसाची प्रतिमा खराब होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित होते. करमाळा शहर व तालुक्यात बेकायदेशीर दारू, मटका, जुगार, अवैध वाळू धंदे वेगात सुरू आहेत, त्यामुळे क्राईम वाढले आह़े, अशा तक्रारी देवानंद बागल, सुहास घोलप, महेश चिवटे यांनी दिल्या आहेत. त्यावर जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी स्थानिक अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यास, खोट्या फिर्यादी दाखल होत असल्यास पोलीसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सूचना दिल्या.
Previous Articleकाँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांचा सत्कार
Next Article समर्थनगर येथे मटका अड्डय़ावर छापा









