इचलकरंजी / प्रतिनिधी
अवैधपणे विदेशी दारुची विक्री करीत असलेल्या शहरातील माजी नगरसेवकाच्या दारु अड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला. पोलिसांनी माजी नगरसेवकासह त्यांच्या मुलगा अन्य एक जण अशा तिघाना अटक केली. त्याच्याकडून ४३ हजार ३९४ रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त केली. याच दरम्यान बेकायदेशिरपणे विदेशी दारुची वाहतुक करीत असलेल्या दोघाना विदेशी दारु, दुचाकीसह अटक केली.
अटक केलेल्याच्यामध्ये माजी नगरसेवक शहीद गुलाब कलावंत ( वय ६१), त्यांचा मुलगा अमिर शहीद कलावंत ( वय ४०, दोघे रा. टाकवडे वेस, गावभाग, इचलकरंजी), किशोर बाळासाहेब पाटील ( वय ३९, रा.गावभाग, इचलकरंजी), जलाल कादर तगाला, आकाश शिवाजी आवळे ( वय २५, दोघे रा. लालनगर, इचलकरंजी ) याचा समावेश आहे. या सर्वांनी कनार्टक राज्यातून अवैधपणे विदेशी दारु आणून , त्यांची चढ्या दराने विक्री करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी काळात माजी नगरसेवक शहीद कलावंत आणि त्यांचा मुलगा अमिर कलावंत हे दोघे पितापुत्रराहत्या बंगल्यात अवैधपणे देशी-विदेशी दारूची विक्री करीत आहेत. अशी माहिती गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना बातमीदाराकडून समजली. त्यावरुन त्यांच्या बंगल्यावर शुक्रवारी दुपारी छापा टाकला. यावेळी विदेशी दारूची अवैधपणे विक्री करीत असलेले कलावंत पितापुत्रासह तिघे जण पोलिसांना मिळून आले. त्याना अटक करीत त्यांच्याकडून ४३ हजार ३९४ रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त केली आहे. या कारवाई माहिती समजताच माजी नगरसेवक कलावंत याच्या समर्थकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यासमोर हजेरी लावली होती. या कारवाईची शहरात चर्चा रंगली होती.
याचदरम्यान गावभाग पोलिसांनी विदेशी दारुची वाहतुक करीत असलेल्या जलाल तगाला, आकाश आवळे या दोघा युवकाना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि ३ हजार ५०० रुपये किंमतीची विदेशी दारु आणि २० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा २३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याची नोद गावभाग पोलिसात झाली आहे.
Previous Articleसातारा : कारी येथे आगीत घर भस्मसात
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात 998 पॉझिटिव्ह, 21 बळी









