वन्यजीव कायद्यांतर्गत नोंद, वन विभाग सतर्क
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठ गवत मंडई येथे अवैधरित्या 40 जंगली कबुतरे पाळल्या प्रकरणी वन विभागाने समीर मोरे यांच्यावर कारवाई केली. त्याच्याकडील 40 कबुतरे वन्यजीव कायद्यांतर्गत वन विभागाने जप्त केली आहेत. तसेच पशुपक्षी पाळणाऱयांनी वन विभागाकडे नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
उत्तरेश्वर पेठेतील समीर मोरे यांनी 40 कबुतरे पाळली आहेत, पण त्यासाठी त्यांनी परवानगी घेतलेली नाही. बुधवारी मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक आर. आर. काळे, करवीर वनाधिकाऱयांनी बुधवारी ही कबुतरे जप्त केली आहेत. वन्य प्राणी, पक्षी, वन्य जीवांना विनापरवाना पाळणे हा गुन्हा आहे. यासंदर्भात वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे. तसेच ज्यांच्याकडे वन्यप्राणी, पक्षी आहेत, अशांनी 15 मार्चपर्यंत वन विभागाकडे नोंदणी करावी, असे आवाहन वनाधिकारी एस. व्ही. सोनवले यांनी केले आहे.









