ओटवणे / प्रतिनिधी-
आई पाठोपाठ तिसऱ्याच दिवशी मुलाचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना विलवडे फोैजदारवाडी येथे घडली. पाठोपाठच्या दुर्दैवी घटनेमुळे मेस्त्री कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असुन विलवडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुंदरी कृष्णा मेस्त्री (८६) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. या दुःखातून मेस्त्री कुटुंबिय सावरत असतानाच महेश कृष्णा मेस्त्री (वय ४४) या युवकाचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. महेश मेस्त्री यांचे बांदा कट्टा काँर्नर येथे पान शाँप आहे. बांदा येथील फर्निचर दुकानचे मालक संतोष मेस्री यांचा तो भाऊ होत.









