ऑनलाईन टीम / बीजिंग :
एलएसीवर शांतता असताना भारताला रोहतांग येथील अटल बोगद्याचा चांगला उपयोग होईल. पण, भारताने या बोगद्याचा युद्धात वापर केल्यास चिनी सैन्य अवघ्या काही मिनिटांत हा बोगदा नष्ट करेल, असा धमकीवजा इशारा चीनने मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणारा हा अटल बोगदा भारताला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणार नाही. बोगदा नष्ट करण्याच्या अनेक पद्धती चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीकडे आहेत. काही क्षणात बोगदा नष्ट होऊ शकतो. त्यामुळेच भारत आणि चीनने एकमेकांसोबत शांततापूर्ण संबंध काम ठेवणेच दोन्ही देशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल, असा सल्ला ग्लोबल टाइम्सने आपल्या लेखातून दिला आहे.
भारत आणि चीनच्या युद्ध क्षमतेमध्ये खूप फरक आहे. चीनच्या तुलनेत भारताची युद्ध क्षमचा खूपच कमकुवत आहे. त्यामुळे भारताने युद्धासंदर्भात संयम बाळगावा, असेही या लेखात म्हटले आहे. लष्करी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ असणाऱ्या साँग झाँगपिंग यांनी हा लेख लिहिला आहे.









