जल्लोषात रंगोत्सव साजरा : पारंपरिक वाद्यांचा गजर : बहुतांशी गावात डॉल्बीला फाटा
वार्ताहर / किणये
तालुक्मयात शुक्रवारी रंगपंचमी मोठय़ा उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यंदा कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे बहुतांशी गावात साधेपणाने रंगोत्सव साजरा करण्यात आला. विविध पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली. एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत तरुण व महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला.
ग्रामीण भागामध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी अवघा तालुका रंगात रंगून गेला होता. आयुष्यातील दुःख विसरून सप्तरंगांप्रमाणे अनेक जण रंगात रंगलेले दिसत होते. जल्लोषी वातावरणात एकमेकांना भेटून गावच्या वेशीत, गल्लीमध्ये, कोपऱयावर, चौकात रंग खेळण्याचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये दुपारी 12 तर काही गावांमध्ये 12-30 पर्यंत रंगोत्सव साजरा करण्यात आला.
हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील होळी कामाण्णा व सर्व देवदेवतांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर रंगोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोनामध्ये वाढ होत असल्यामुळे प्रशासनामार्फत सण व उत्सव यावरती बरेच निर्बंध घातलेले आहेत. प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करत ग्रामीण भागात साध्या पद्धतीनेच रंगपंचमी झाली.
ढोल-ताशासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात तरुणाई थिरकत होती. सकाळी आठ वाजल्यापासून बहुतांशी गावात रंगपंचमीला सुरुवात झाली. यामध्ये लहान बालकांसह तरुणांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग दिसून आला. डॉल्बीला यंदा फाटा देण्यात आला. तरीही बऱयाच गावांमध्ये तरुण रंगांची उधळण करीत असताना व नृत्य करतानाचे चित्र पहावयास मिळाले.
तालुक्मयातील आंबेवाडी, हिंडलगा, मच्छे, पिरनवाडी, मंडोळी, हंगरगा, खनगाव खुर्द आदींसह काही मोजक्मया गावांमध्ये धुलिवंदनाच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात आली तर उर्वरित तालुक्मयाच्या सर्व गावांमध्ये शुक्रवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे.
सध्या कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तसेच बहुतांशी गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे सुक्मया रंगांची उधळण करण्यावरच अधिक भर देण्यात आला. गेल्या चार-पाच दिवसांपासूनच रंगपंचमीची तयारी तरुणांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी रंगोत्सवाचा आनंद लुटला. रंगपंचमी म्हणजे ग्रामीण भागात त्या दिवशी मटणाचा बेत आखलेलाच असतो. शुक्रवारी दुपारनंतर शेतशिवारांमध्ये तरुणांच्या ओल्या पाटर्य़ाही रंगल्या होत्या.
तालुक्मयातील काही गावांमध्ये धुळवडीच्या आदल्या दिवशी विविध प्रकारची लाकडे, गोवऱया, झाडांच्या फांद्या एकत्र करून होलिदहन करण्यात आले. तसेच काही गावांमध्ये होळी उभारण्याची प्रथा आहे. लांब लाकडाला आंबोत्या बांधून होळी उभारण्यात येते. होळी उभारताना हलगी वाद्यासह बोंबही मारण्यात येते. होळी उभारणीनंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. गेले पाच दिवस होळी कामाण्णा मंदिराजवळ विविध प्रकारच्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. होळी सणातील पाच दिवस शेतकरी वार पाळणूक करतात. या पाच दिवसांमध्ये शिवारातील कामेही काही ठिकाणी बंद केलेली असतात. यामुळे गावागावांमधील मंदिरांमध्ये कट्टय़ावर गावच्या विविध विकासकामांबद्दल तसेच सणवार साजरे करण्याबद्दल चर्चाही करण्यात येते. शुक्रवारी रंगपंचमीनिमित्त तालुक्मयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलिसांनी गस्तही सुरू ठेवली होती. एकंदरीत साधेपणाने व शांततेत रंगोत्सव नागरिकांनी साजरा केला..
बेकिनकेरे-अतिवाडमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी

बेळगाव : विविध रंगांची उधळण करत बेकिनकेरेत शुक्रवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रंगपंचमी साधेपणात साजरी झाली तरी बालचमूंचा उत्साह अमाप दिसून आला. काही तरुणांची पावले डॉल्बीच्या तालावर थिरकताना दिसून आली. विविध रंगांनी न्हाऊन निघालेल्या तरुणाईने या उत्सवाचा आनंद लुटला. याबरोबरच अतिवाडमध्ये देखील रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. यावेळी तरुणांसह तरुणींदेखील रंगपंचमीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे तरुणींचा उत्साह देखील ओसंडून वाहत होता. गल्लो-गल्ल्ली बालचूमंनी देखील एकमेकांवर रंग उडवत रंगपंचमीचा आनंद लुटला.









