एनजीओंकडून अंगणवाडी शिक्षिका धारेवर
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी, शांती कॉलनी येथील अंगणवाडीमार्फत खराब साहित्य वितरीत करण्यात येत आहे. गर्भवतींना सकस आहाराचा पुरवठा केला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे माजी नगरसेवक पंढरी परब यांच्यासह एनजीओच्या पदाधिकाऱयांनी याचा जाब अंगणवाडी शिक्षिकेला विचारून वरिष्ठ अधिकाऱयांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
गर्भवतींना सकस आहार देण्याची योजना शासनाने राबविली आहे. पण सकस आहाराऐवजी अळय़ा असलेले साहित्य देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अंगणवाडीतील मुलांनाही याच साहित्याचा पुरवठा केला जात आहे. काही गर्भवतींना आहार पुरवठा करण्यात आला नाही. अंगणवाडी शिक्षिकेबाबत तक्रारी वाढल्या होत्या. याची तक्रार सिद्धी महिला मंडळाकडे व एनजीओकडे करण्यात आली होती. याची माहिती माजी नगरसेवक पंढरी परब यांनाही देण्यात आली. यामुळे महिला मंडळाच्या सदस्या आणि पंढरी परब यांनी एनजीओंच्या सदस्यांसह अंगणवाडीकडे धाव घेतली. याचा जाब अंगणवाडी शिक्षिकेला विचारण्यात आला.
शिक्षिकेकडून उडवा-उडवीची उत्तरे
शासनाकडून मिळणारे साहित्य आम्ही वितरीत करीत आहोत, असे सांगून उडवा-उडवीची उत्तरे दिली. खराब साहित्य पुरवठा होत असल्यास वरि÷ अधिकाऱयांकडे सूचना का केली नाही. गर्भवतींना देण्यात येणारा सकस आहार परस्पर विक्री का केला जातो, अशी विचारणा पंढरी परब यांनी केली. पण याबाबत समर्पक उत्तर देता आले नाही. खराब झालेले साहित्य सकस आहार म्हणून गर्भवतींना दिले जाते का? अशी विचारणा करून साहित्याचा पुरवठा व्यवस्थित व वेळेवर करण्यात यावा, अशी सूचना केली. पुन्हा तक्रार झाल्यास वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार करण्याचा इशाराही परब यांनी अंगणवाडी शिक्षिकेला दिला.









