सत्य हे एकच नसते पण त्याचा कलेतून वेगवेगळय़ा अंगानी शोध घ्यायचा असतो. अभिजित झुंजारराव नाटय़विचारातून सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करताना ते इथल्या भूसांस्कृतिकतेचाही शोध घेतात.भूसांस्कृतिकतेचा शोध घेणे म्हणजे आपापले संचित शोधणे असले तरी प्रत्येक भूमितील सहिष्णुताच जपणे होय!
जात-धर्माच्या पलीकडील आपल्या एकात्मतेची मुळे आपल्या मातीतच रूजलेली असतात. सगळय़ाच धर्माची सहिष्णुता एकमेकात मिसळलेली असते. आपण मात्र अलीकडल्या काळात ही मुळे विसरून एकात्मतेच्या प्रेमाची भिंत तोडून टाकण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. अशावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाटय़दिग्दर्शक अभिजित झुंजारराव ‘अल्ला विठ्ठला’…अशी गाण्याची निर्मिती करून आपल्याला हाक देतात तेव्हा त्याच्यातील संवेदनशीलताच आपल्यापर्यंत झिरपून पोहोचत नाही तर त्याच्यातील माणूसपण टिकवून ठेवण्याचा अंशही आपल्यात मिसळत जातो. आणि मग त्यांच्यातील कलाकार म्हणून हे सच्चेपण इतरांमध्येही उतरत जावो असेही वाटत राहते.
अल्ला विठ्ठलाची मुळे आधीच रुजली होती. आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीत असतील. गावातल्या मातीत, गावतल्या निरागस माणसात असतील. नेमकी हीच निरागसता हरवत चालली आहे, असा काळ आ वासून समोर उभा राहिला आहे. त्यावर आलेली प्रतिक्रिया म्हणजेच अल्ला विठ्ठला. माणसातले माणूसपण जपले तर जाती धर्मावर वाद होणारच नाहीत. अठरापगड जाती एकोप्याने एका गावात नांदताना ज्याने पाहिल्यात, तुकोबा, सावता, एकनाथ, नामदेव, कबीर, ज्ञानेश्वर, मुक्ताई ज्याच्या ठाई ठाई असतील. मोहरमचा ताबूत ज्याने उत्साहात नाचवला. त्याला वारीचे प्र्रयोजन कळले नसेल काय? जर कळल नसेल तर पंढरीच्या विठोबाकडे जाणे झूट आहे. मग अल्ला विठ्ठला कुठून आले हा प्रश्नच फिजूल ठरतो. ते आज अचानक आलेले नाही. त्याची पाळमुळे खोल कुठेतरी आधीच पेरली गेली आहेत. ती ज्या ज्या वेळी उखडून टाकण्याचा प्र्रयत्न होईल त्या त्यावेळी हा अल्ला विठ्ठला ठुश्या मारत राहील. अभिजित याचे असे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. आणि मग आपणच आपल्याशी अंतर्मुख होत जातो. आजघडीला अभिजित यांची एक विचारशील रंगकर्मी म्हणून ओळख आहे. पण त्याचा आत्मशोध घेताना ते म्हणतात, ही माझी खरी ओळख नाही. याचा शोध बराच मागे जाऊन घ्यावा लागेल. तुम्ही अमुक एका घरात जन्माला येता, अमुक एक संस्कार तुमच्यावर होतात, अमुक एक विचारसरणी तुमच्यावर प्र्रभाव टाकते. ती प्रभाव टाकते न टाकते तोच ती कशी फोल आहे याचे ज्ञान तुम्हाला होते. ते ज्ञान तुम्हाला कोण देते? माहिती नाही. जगण्याच्या रेटय़ात ते आपले आपल्याला सापडत जाते. ते जे काही सापडले आहे असे वाटते ते मांडण्याची जागा आपण शोधायचा आपला आपला मार्ग निवडतो. ती आपली ओळख ठरते. मग अमका एक नट ठरतो, अमका एक लेखक ठरतो, अमका कवी ठरतो, अशी अमक्मया एकाची यादी वाढत जाते. त्या वाढलेल्या यादीतून माझा नंबर लागला असावा ‘नाटकवाला’. तर या नाटकवाल्याची मुळे खोल कुठेतरी शेणात, मातीत, गुरा ढोरात, डोंगर दऱयात, पाण्या पावसात आणि माणसात रुतलेली आहेत. माणूस जर केंद्रस्थानी असेल तर तुमचे कोणत्याही माध्यमात व्यक्त होणे उथळ न होता जास्तीत जास्त परिपक्वतेकडे जाणारे ठरते. जोवर माणसा माणसात संवाद आहे तोवर नाटकाला मरण नाही. अमुक एकजण नाटक प्रेक्षकापुढे मांडतो. म्हणजे नेमके काय करतो? तर तो एक विचार आपल्या समोर ठेवतो. मग तो विचार भला आहे की बुरा आहे, हे ते नाटक पाहणारा त्याच्या त्याच्या आकलन क्षमतेचा वापर करून ठरवतो. तुमच्या नाटकांची निवड तुमचे एकंदरीत माणूसपण आणि समाजभान अधोरेखित करत असते. याच अंगाने आपल्या नाटकाविषयी बोलताना अभिजित म्हणतात, लेझीम… नाटका मधल्या साबरमती कवितेतली रुक्साना, बाई गं बाई मधली ती, पोरी कवितेतल्या पोरी, बापू कवितेतले बापू माझ्या अवतीभोवतीच तर आहेत. निर्वासित मधले कुटुंब. त्यातला बाप आणि मुलगा त्यांना अलगद उचलून त्या रंगमंचीय अवकाशात मोकळ सोडले आहे इतकेच. ती तुम्हाला का भावली कारण ती तुमच्या माझ्यातच तर होती. इतके साधे आहे जगणे. ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला?’ मधले जयंतराव काल परवा माझ्या बाजूच्या घरात रहात होते आज तसेच्या तसे उचलून चिमटीत पकडून काळय़ाशार अंधरातून अलगद प्र्रकाशाच्या तिरीपेत रंगमंचावर सोडून दिले. ते सच्चे आहेत. कोणताही कृत्रिमपणा त्यांच्यात नाही. र्द्द्पोरा मधली नूर, मुस्कान, दोजख मधली नादिया, दगडओठ मधला राजाराम शिंदे. अल्ला विठ्ठला मधला फुलवाला, सफाई कामगार हे हे सगळे खरे आहेत. घटोत्कचमधला पौराणिक पात्रांमधला माणूसपणा, तो आजवर दैवीपणाचा बुरखा चढवून त्याचा खरा चेहरा लपवू पहात होता. तो बुरखा फाडून थोडासा खरवडला तर बिघडले कुठे? ही सगळी पात्रे माझ्या गावातल्या शेणा मातीत आहेत. पावसाच्या पडलेल्या थेंबात आहेत. मातीतून उगवलेल्या कोंभात आहेत. गवताच्या पात्यावरून अलगद ओघळणाऱया दवबिंदूत आहेत. भेटलेल्या प्र्रत्येक माणसात आहेत. माणसापासूनच सुरू झालेला हा प्रवास आहे. माणसापाशी जावूनच थांबणार आहे. सगळय़ाच बंधनातून मुक्त होऊन जर कलाकृती सादर झाली तर ती तिच्या प्राकृतिक स्वरूपात मोकळेपणाने समाजापुढे जाऊ शकते. श्रे÷ निर्मिती मग ती कोणतीही असेल. चित्रकला असेल, शिल्पकला असेल, संगीत असेल किंवा एखादा सिनेमा वा नाटक असेल. ते पाहून जर अस्वस्थता वाटत नसेल, सकारात्मकदृष्टय़ा एकटेपणा येत नसेल, अचानक पोकळी आल्यासारखा भास होत नसेल, तर ती कलाच नाही. रंजन मूल्यांपलीकडे जाऊन कोणतीही कला खोल कुठेतरी रुतली पाहिजे. ती खोल कुठेतरी रुतली असेल तरच श्रे÷ समाज निर्माण व्हायला मदत होईल. दांभिकतेने सादर केलेले काही स्वीकारले जात नाही. अभिजित आपल्या नाटय़प्रवासाविषयी असे जे चिंतन मांडतात ते फक्त मराठी रंगभूमीविषयीच भान देणारे नाही तर ते सर्वच कलांना लागू आहे. म्हणूनच हा विचार सर्वकाळ लागू आहे. सत्य हे एकच नसते पण त्याचा वेगवेगळय़ा अंगानी कलेतून शोध घ्यायचाच असतो. अभिजित नाटय़विचारात सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करताना ते इथल्या भूसांस्कृतिकतेचाही शोध घेतात. भूसांस्कृतिकतेचा शोध घेणे म्हणजे आपापले संचित शोधणे असले तरी प्रत्येक भूमितील सहिष्णुताच जपणे होय!
अजय कांडर








