वृत्तसंस्था/ लंडन
2021 एफ-वन ग्रा प्रि मोटार रेसिंग हंगामाअखेर चालक अँटोनिओ गिव्होनेझी अल्फा रोमिओ या आपल्या संघाला निरोप देणार असल्याची माहिती या संघाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
इटलीचा गिव्होनेझी गेल्या तीन मोटार रेसिंग हंगामात अल्फा रोमिओ संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. त्याने या स्वीस संघाकडून 59 शर्यतींमध्ये आपला सहभाग दर्शविला होता. या संघाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी तसेच अन्य चालकांनी गिव्होनेझीला शुभेच्छा दिल्या.









