तरुण ताब्यात, सिव्हिलमध्ये वैद्यकीय तपासणी
प्रतिनिधी/ बेळगाव
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन माळमारुती पोलिसांनी श्रीनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
सुरेश मादर (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.वि. 363, 376 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणी सुरेशला अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 4 मे 2020 रोजी ही घटना घडली असून 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्या अल्पवयीन मुलीलाही वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रायबाग तालुक्मयातही घटना
रायबाग तालुक्मयातील मुगळखोड परिसरातही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हारुगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून 15 वषीय मतीमंद मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.









