प्रतिनिधी/ बेळगाव
एका अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. शुक्रवारी दुपारी खासबाग परिसरात ही घटना घडली असून रात्री उशिरा शहापूर पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी यासंबंधी 40 वषीय किराणा दुकानदाराला अटक केली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
9 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. किराणा दुकानदाराचे वर्तन सहन न झाल्याने त्याच्याकडून सुटका करून घेतलेल्या बालिकेने धावत घरी जाऊन घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे संबंधिताला चोपही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.









