वार्ताहर / पाचगाव
शांतीनगर पाचगाव येथील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी करवीर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
पाचगाव मधील शांतीनगर परिसरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. अज्ञात व्यक्तीने या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळून नेले आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी अज्ञातांनी मुलीला पळवून नेल्याची तक्रार करवीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









