पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. बुधवारी यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
कडोली येथील एका 17 वषीय 8 महिने वयाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. घुग्रेनट्टी येथील 29 वषीय युवकाने हे कृत्य केले असून दोन दिवसांपूर्वी हे दोघे काकती पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
घुग्रेनट्टी येथील तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.