तरुण भारत संवाद वार्ताहर / मंगळवेढा
मंगळवेढा शहरालगत एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी समाधान भिमराव मेटकरी व त्याचा मित्र यश बाबर या दोघांना अटक केले आहे. पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यातील अल्पवयीन पीडित मुलगा हा केस कापण्यासाठी जात असताना आरोपी समाधान मेटकरी व त्याचा मित्र यश बाबर या दोघांनी मोटर सायकलवर बसून मंगळवेढा शहरनजीक असलेल्या भंगार दुकानाकडे घेवून गेले. तेथून सुतगिरणीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नेवून पीडित मुलास मारहाण करून अंगावरील कपडे काढून त्या दोघा आरोपींनी अनैसर्गिक कृत्य करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले. सदरची घटना कोणास सांगितल्यास मोबाईल चित्रण व्हॅटसअपवर टाकीन व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे यांनी वरील दोघा आरोपींना अटक करून पंढरपूर न्यायालयात उभे केल्यावर दि. 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.









