वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेला अल्जेरियाचा पुरूष टेनिसपटू आयमेन इकलेफ याच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने आजीवन बंदी घातली आहे.
23 वर्षीय इकलेफ याचा मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आले. टेनिस संघटनेच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने या प्रकरणाची चौकशी केली. अल्जेरियाच्या इकलेफवर आजीवन बंदी तसेच एक लाख डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे.









