प्रतिनिधी /पणजी
पर्वरी येथील अलिशा ज्ञानेश्वर मळीक यांना गोवा विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली आहे. गोवा विद्यापीठातील मायकोबॉयॉलॉजी विभागाच्या प्रा. डॉ. आयरीन फुर्तादो यांच्या मार्गदर्शनाखाली डिग्रेडेशन ऑफ प्लांट पॉलिमरस बायसेल्यूलेज अँड जायल्यानेस या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी गोवाविद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण शारदामंदिर, विद्यायल, मिरामार येथे तर माध्यमिक शिक्षण होली फॅमिली हायस्कूल, पर्वरी येथे झाले. धेंपे उच्चमाध्यमिक विद्यालयात अकरावी बारावी व सेंट झेवियर कॉलेज, विज्ञान शाखेतून मायकोबॉयॉलॉजीमध्ये (सूक्ष्मजीवशास्त्र) बीएससी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. गोवा विद्यापीठातून मरीन मायकोबॉयॉलॉजी या विषयात प्रथम क्रमांक घेऊन एमएससीची पदवी प्राप्त केली व विद्यापीठात सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. 2 नोव्हेंबर 2021 रोजी बायकोबॉयॉलॉजी या विषयात (डीग्रेडेशन ऑफ फ्लांट पॉलीमरस बाय सेल्यूलज अँड जथाल्यूनेस) गोवा विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली. वाळपई येथील ज्येष्ठ कवी माधव सटवाणी यांच्या त्या स्नुषा होत.









