बिजींग / वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध अलिबाबा या व्यापारी कंपनीचे संचालक आणि जगातील सर्वात धनवान व्यक्तींपैकी एक असणारे चीनी उद्योगपती जॅक मा हे बेपत्ता असल्याच्या वृत्ताने जगभर खळबळ उडाली आहे. ते गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे आणि मा यांचे मतभेद झाल्याने त्यांच्यात काही काळापासून संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षातूनच ते बेपत्ता झाले आहेत का, असा प्रश्न जगाभरात विचारला जात आहे. ते बेपत्ता झाले आहेत की त्यांचे अपहरण झाले आहे, यावरही चर्चा सुरू आहे. आतापर्यंत चीनी प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया न आल्याने संशय वाढला आहे.









