प्रतिनिधी/ बेळगाव
दिवसेंदिवस कोरोनाच्या गडद संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन काळात पोलीस मात्र काटेकोरपणे आपली सेवा बजावत आहेत. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना येथील अलायन्स इंटरनॅशनल क्लबच्यावतीने मास्क वितरण करण्यात आले. येथील टिळकवाडी पोलीस स्थानकात अलायन्स इंटरनॅशनल क्लबच्या बेळगाव शाखेच्या प्रांतपाल नवीना शेट्टीगार, सचिव भाग्यश्री कालकुंद्रीकर यांच्या हस्ते पोलिसांना मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी राजश्री देसाई, बलराज मल्लाप्पागोळ, वर्षा निलजकर, उपप्रांतपाल मानसी चौगुले, सीपीआय विनायक बडीगेर आदींसह क्लबचे सदस्य उपस्थित होते.









