प्रतिनिधी/ बेळगाव
अलतगा येथील ग्रामस्थांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निषेध करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी देवस्थान पंच कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सीमाप्रश्नाच्या लढय़ात आम्ही सक्रिय असून कर्नाटकाने आणि केंद्र सरकारने बेळगाव सीमाभागावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असून याकडे जातीने लक्ष देऊन प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हाच हा प्रश्न सुटेल. सीमाभागावर जे अन्याय, अत्याचार होत आहेत त्याचा निषेध वारंवार नोंदविण्यात आम्ही कधीही मागे पडणार नाही. तिसरी पिढी सक्रिय असून एकनिष्ठेने कार्यरत राहणार आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे. कोरोना काळातही नियम पाळून आम्ही सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे नमूद केले.
यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडुम, सदस्य पितांबर पाटील, गुंडू कदम, विष्णू कोचेरी, उमेश चौगुले, तुकाराम चौगुले, राजू पावशे, लक्ष्मण पावशे, लक्ष्मण घुग्रेटकर, परशराम पाटील, गणपत आलोजी, आप्पाजी पाटील, यल्लाप्पा कडोलकर, पुंडलिक पाटील, परशराम चिखलकर, कल्लाप्पा पावशे, बाळु चौगुले, मनोहर आलोजी, संभाजी घुग्रेटकर, तुकाराम चौगुले, नारायण पावशे, उमेश चौगुले, सदाशिव पावशे, गणपत सुतार, जयराम पावशे, पिराजी पावशे, सदाशिव पावशे, ज्ञानेश्वर पावशे, वैजू चौगुले, दुर्गाराम पाटील, रुपेश चौगुलेसह ग्रामस्थ आणि महिलांनीही सरकारचा निषेध नोंदविला आहे.









