ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरळीत चालू होते. मात्र, चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अलका लांबा आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मतदानाच्या बूथवर अलका लांबा आल्या असता त्यांच्यावर एका आप कार्यकर्त्याने त्यांच्या मुलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे वक्तव्य ऐकल्यानंतर अलका लांबा यांचा स्वतःवरचा ताबा सुटला अन् त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप घेत हे प्रकरण तिथेच थांबवले.