प्रतिनिधी / पणजी
शिरदोन समुद्रकिनारी मृतावस्थेत सापडलेल्या आणि छिन्नविछिन्न झालेल्या अर्भकाचा तपास नीट होत नसल्याच्या निषेधार्थ आगशी पोलीस स्टेशनवर गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाऊन जाब विचारला व याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. तेव्हा चौकशी चालू असल्याचे त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले.
संकल्प आमोणकर, अमरनाथ पणजीकर, वरद म्हार्दोळकर, जना भंडरी, अर्चित नाईक, विवेक डिसिल्वा, टोनी फर्नांडिस, साईश आरोस्कर, सुकोरीन गोन्साल्वीस, ग्लेन काब्राल, सुदिन नाईक, प्रतिभा ढगे, प्रिया राठोड, देसुर्बी यदुवंशी, विशाल वळवईकर, विठू मोरजकर, चंदन मांद्रेकर, प्रँकी पिर्रास यांचा त्यात समावेश होता.









