योगअभ्यासातील मुद्रांपैकी मातंगी मुद्रा, हायपोथॅलेमस सक्रीय करून तणाव कमी करण्याचे काम करते. श्वासोच्छ्वासाची लय ठीक करते.
- · नाभी सरकणे आणि मणिपूर चक्र संतुलित करण्यासही मदत करते. त्यामुळे पचनशक्ती वाढते. यामुळे भ्रम किंवा भास, शंका, भीती, ईर्ष्या आदी प्रवृत्ती दूर करून आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
- शरीर आणि मन यांच्याविषयीच्या अनेक आरोग्य समस्यांमध्ये ही मुद्रा रामबाण औषधाप्रमाणे काम करते.
- मातंगी मुद्रा कोणत्याही
आरामदायी स्थितीत बसून करता येते. कोणत्याही आसनात पाठ ताठ ठेवून बसावे. - दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवावीत. मग दोन्ही हातांचे मधले बोट बाहेर काढून एकमेकांना जोडावे.
- दोन्ही हातांनी तयार झालेली ही मुद्रा पोटाच्या नाभी चक्रापाशी ठेवावी आणि लक्ष्य श्वासावर केंद्रीत करावे.
- अत्यंत उपयुक्त अशा या मुद्रेचा फायदा मिळवण्यासाठी याच स्थितीत 5 ते 30 मिनिटे थांबावे.