ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ते म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प वास्तवाचे भान हरवलेला असून केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे. या अर्थसंकल्पाने मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा, मेट्रोचा विकास यासाठी अपेक्षित असणार आर्थिक बळ या बजेटमध्ये दिसत नाही.