ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लिलाव सिद्धांतात सुधारणा आणि नवीन लिलाव स्वरुपांच्या शोधातील योगदानासाठी पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांनी लिलावाची तत्त्वे आणि लिलावाच्या नव्या प्रारुपाच्या शोध लावला. त्यामुळे ज्या वस्तू आणि सेवा पारंपरिक पद्धतीने विकणे कठीण आहे, त्यांचाही लिलाव सोपा झाला आहे. जगभरातील विक्रेते, ग्राहक आणि करदात्यांना याचा फायदा झाला आहे.
दरम्यान, मागील वर्षी अमेरिकी-भारतीय अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी, इस्टर डफलो आणि मायकल क्रेमेर यांना संयुक्तपणे अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते. त्यावेळी 11 लाख अमेरिकन डॉलर्स पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आले होते.









