प्रतिनिधी / शिरोळ
अर्जुनवाड व धरणगुत्ती या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सव्वीस जणांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की अर्जुनवाड येथील ज्ञानदेव मगदूम यांच्या शेतातील खोलीमध्ये प्रदीप मगदूम, प्रवीण मगदूम, प्रमोद देशिंगे, बताश साळुंखे, धोंडीराम डोंगरे, राहुल देसाई, प्रदीप डोंगरे, तानाजी देसाई, दत्तात्रय डोंगरे, संजय यादव, आनंदा सूर्यवंशी, प्रदीप पाटील, अमोल चौगुले, विकास पाटील, दीपक मगदूम व संतोष पाटील सर्व राहणार अर्जुनवाड ता. शिरोळ हे सर्वजण कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये विना मास्क फिरणे बाबत बंदी असताना देखील शुक्रवारी दि 13 रोजी तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पो हे कॉ डी डी सानप, युवराज खरात ताहीर मुल्ला, हनुमंत माळी, गजानन कोष्टी यांनी धाड घालून दहा लोकांना ताब्यात घेतले तर रोख 44 हजार रुपये जुगाराचे साहित्य दोन लाख दहा हजार रुपयाच्या वेगळ्या मोटरसायकली असा एकूण दोन लाख 54 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात यांनी दिली.
धरणगुत्ती ता. शिरोळ येथील सुरेश आरगे यांच्या शेतामध्ये असलेल्या खोपीच्या आडोशाला बाळासो पाटील, भाऊसाहेब कांबळे, सुरेश आरगे, शशिकांत चौगुले, शेखर पाटील, नामदेव कांबळे, सर्व राहणार धरणगुती गुंडाप्पा पवार महेश मडिवाळ राहणार उदगाव व सुनील माळी राहणार नांदणी देश हे तीन पत्त्याचा जुगार खेळत असताना पोलीसांनी सुनील माळी राहणार नांदणी देश हे तीन पत्त्याचा जुगार खेळत असताना पोलीसांनी धाड टाकून वरील लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार हजार रुपये रोख एक लाख 90 हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकली असा 2 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास हनुमंत माळी हे करीत आहे.









