प्रतिनिधी / शिरोळ
अर्जुनवाड ता. शिरोळ येथील फिर्यादी जालंदर रामचंद्र महाडिक यांचे सिद्धनाथ होजिअरी कापडाचे दुकान भिंतीचे कॉर्नर पिस वरून सोळा हजार रुपये किंमतीचे व्हीवो वाय-50 मोबाईल चोरून नेले बाबत 16 जानेवारी रोजी शिरोळ पोलीसात फिर्यादी दिली होती.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज आधारे बेघर वसाहत मल्लेवाडी तालुका- मिरज येथून दिनांक 23/01/2021 रोजी महीला पोलीस सोबत घेऊन सदर गुन्ह्यातील संशयित महिला हरणाबाई सिलोन भोसले (पारधी समाज ) व.व 45 रा. बेघर वसाहत, मल्लेवाडी ता. मिरज जि. सांगली हिस शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता तिने सदर गुन्हा कबूल केला. सदर चोरीस गेला सोळा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.
सदर आरोपी यांच्याकडून आणखीन काही गुन्हे केलेले आहेत काय याची चौकशी चालू आहे. सदरची कारवाई सपोनि एस. बी. कुंभार यांचे मार्गदर्शनखाली पो हे कॉ ज्ञानदेव सानप, हनुमंत माळी, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, अभिजित परब, महीला पोलीस प्रियांका कदम या पथकाने केली आहे.